“डोंगर–दऱ्या, नद्या–नाले…
कळंबट–केरे–घावळगाव निसर्गाची शाळा.”
ग्रामपंचायत स्थापना दिनांक : ०९.०५.१९५९
आमचे गाव
ग्रामपंचायत कळंबट केरे घावळगाव, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी ही कोकणातील निसर्गसंपन्न व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशी ग्रामपंचायत आहे. डोंगरदऱ्यांनी वेढलेली भौगोलिक रचना, हिरवीगार वनराई, स्वच्छ नद्या–नाले, सुपीक माती आणि कृषीप्रधान जीवनशैली ही या भागाची प्रमुख ओळख आहे.
येथील ग्रामस्थ शेती, बागायती, पशुपालन व पारंपरिक व्यवसायांवर आधारित जीवन जगत असून एकात्मता, परंपरा आणि परिश्रम ही या गावांची खरी ताकद आहे. निसर्गाशी सुसंवाद राखत आधुनिक विकासाकडे वाटचाल करणे, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, जलसंधारण तसेच शिक्षण व सामाजिक प्रगतीला चालना देणे हे ग्रुप ग्रामपंचायतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि शाश्वत विकास या त्रिसूत्रांवर आधारित कार्यपद्धतीद्वारे कळंबट केरे घावळगाव ग्रुप ग्रामपंचायत सर्वांगीण विकासाच्या दिशेने सातत्याने प्रयत्नशील आहे..
१६०९.४१
हेक्टर
७५२
एकूण क्षेत्रफळ
एकूण कुटुंबे
ग्रामपंचायत
कळंबट केरे घावळगाव,
मध्ये आपले स्वागत आहे...
एकूण लोकसंख्या
२८८९
सरकारी योजना
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.
हवामान अंदाज








